LIVE UPDATES

माजी मंत्री दीपक केसरकरांचा वाढदिवस उत्साहात

शिवसैनिकांकडून विविध सामाजिक उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 18, 2026 13:40 PM
views 97  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात शिवसेना व दीपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीनं विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. संपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कुटुंबियांच्यावतीन मुंबई येथे वाढदिवस साजरा केला. 

सावंतवाडी तालुक्यात शैक्षणिक साहित्य वितरण, वृक्ष वितरण, रक्तदान शिबीर आदी उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला.  युवा रक्तादाता संघटना व नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळाच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांच्या पुढाकारातून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना बिस्कीट वाटप करण्यात आले. यानंतर अंकुर केंद्रातही हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच ग्रामीण भागात आरोग्य केंद्र, शाळांत विविध उपक्रम राबविले गेले. वृक्ष वाटप देखील करण्यात आले. शिवसेनेच्यावतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद साधत दीपक केसरकर यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. ते म्हणाले, आपण वाढदिवस कधी साजरा करत नाही. जनतेचे प्रेम, आशीर्वाद माझ्यासोबत आहे. माझं जीव जनतेसाठी समर्पित करण्याचं ठरविले आहे, त्यांचे प्रेम हीच माझी ताकद आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेच्यावतीने संपर्क कार्यालयात केक कापून जल्लोषी वातावरणात वाढदिवस साजरा  करण्यात आला. २० जुलैला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबीर होत आहे. या शिबिरात जवळपास २२ हून अधिक सेवा दिल्या जाणार आहेत. १०० डॉक्टर उपस्थित राहणार असून गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले.  विविध सामाजिक उपक्रम राबवत दीपक केसरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड निता सावंत-कविटकर, सभापती सुस्मिता जाधव, तालुकाप्रमुख बबन राणे, दिनेश गावडे, अशोक दळवी, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, नगरसेवक अजय गोंदावळे, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, शरद धाऊसकर, प्रणाली टिळवे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, भारती मोरे, ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, अनारोजीन लोबो, देव्या सुर्याजी, सुरेंद्र बांदेकर, विनोद सावंत, परिक्षीत मांजरेकर, अर्चित पोकळे, तात्या वेंगुर्लेकर, विश्वास घाग आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.