
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात शुक्रवारी दुपारी १.१५ वाजता कंटेनरने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार महामार्गावरून खाली गेली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र कारचे मोठे नुकसान झाले.
दोन्ही वाहने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना भोस्ते घाटातील ब्लाइंड स्पॉट परिसरात (क्र. UP 14 ER 3729) कारला मागून भरधाव कंटेनर (क्र. HR 55 AF 1736) ने धडक दिली. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या धडकेत कार महामार्गावरून खाली फेकली गेली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. भोस्ते घाटातील ब्लाइंड स्पॉट आणि वाहनांचा वेग यामुळे अपघाताचा धोका कायम असून, वाहनचालकांनी या परिसरात सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








