LIVE UPDATES

जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचे सुयश

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 06, 2026 16:51 PM
views 25  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग  : जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. ११ वर्षांखालील मुलांच्या इनलाइन स्केटिंग प्रकारात पाचवीतील अंश राऊळ याने प्रथम क्रमांक पटकावला. 

तसेच ११ वर्षांखालील मुलींच्या क्वाड स्केटिंग प्रकारात तिसरीतील विधी वेंगुर्लेकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. या दोन्ही विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचे संचालक मंडळ, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक, शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.