
वेंगुर्ला: भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्या वतीने सेवा ज्योती यात्रा अंतर्गत विकसित भारत संकल्प सभा आज वेंगुर्ला येथे होत असून यानिमित्त खासदार नारायण राणे यांचे वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे आगमन होताच तालुकाध्यक्ष पपु परब यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा संयोजक संदीप मेस्त्री, पं स सभापती शंकर घारे यांच्या सहित भाजप पदाधिकारी, नगरसेवक, जि प सदस्य, पं स सदस्य आदी उपस्थित.










