LIVE UPDATES

वार्षिक एनसीसी शिबिरातील प्रश्नमंजुषा स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालय प्रथम

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 13, 2026 11:47 AM
views 86  views

वैभववाडी : सिंधुदुर्गनगरी येथे पार पडलेल्या वार्षिक राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) शिबिरातील प्रश्नमंजुषा स्पर्धेत तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत विद्यालयाची परी नेवरेकर आणि वैदेही कडू यांनी उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करत हे यश संपादन केले. सिंधुदुर्गनगरी येथे नुकतीच एनसीसी विभागाची प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी तालुक्याचे  प्रतिनिधीत्व केले . त्यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.या यशामागे विद्यालयाचे एनसीसी अधिकारी संदेश  तुळसणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी. एस. नादकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विजेत्या विद्यार्थीनींचे अभिनंदन केले. तसेच या दोघींना पुढील  वाटचालीस शुभेच्छा दिल्या.