LIVE UPDATES

कॉटेज हॉस्पिटलला डॉ. बांदेकर यांच्याकडून ऍक्वागार्ड भेट

Edited by: विनायक गांवस
Published on: May 01, 2026 17:17 PM
views 66  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना पिण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक पाणी उपलब्ध व्हावे म्हणून डॉ. सिद्धेश सुभाष बांदेकर यांनी त्यांची मावशी सौ. नीता अरुण म्हापसेकर व आजी श्रीमती मनोरमा सीताराम रांगणेकर यांच्या स्मरणार्थ दोन ॲक्वागार्ड भेट दिले. महाराष्ट्र व सिंधुदुर्ग दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दानशूर व्यक्तींनी जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयाना त्यांच्या आवश्यकतेनुसार रुग्णोपयोगी वस्तू द्याव्यात असे आवाहन करत डॉ. सिद्धेश बांदेकर यांच्या दातृत्वाबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी डॉ. अनिकेत गुरव, कार्यालयीन अधीक्षक रुपाली हेळेकर, सिस्टर प्राची राणे, वैष्णवी गोसावी, सुप्रिया नाईक, अमृता मुंगी, उज्वला  रांजणकर, हेमांगी रणदिवे तसेच डॉ. सिद्धेश बांदेकर, डॉ . सिद्धेश म्हापसेकर, सौ. प्राची बांदेकर, यशवंत देसाई, अरुण म्हापसेकर, दीपक म्हापसेकर, संजय म्हापसेकर आदी उपस्थित होते.