LIVE UPDATES

मुख्यमंत्री रोजगार कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत तिघांना नियुक्तीपत्रे

पशुसंवर्धन विभागात बहुउद्देशीय कर्मचारी म्हणून निवड : शैक्षणिक पात्रतेनुसार दिले जाणार मानधन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 13, 2026 20:14 PM
views 23  views

सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री रोजगार कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत पशुसंवर्धन विभागात बहुउद्देशीय कर्मचारी म्हणून तीन उमेदवारांची ११ महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली. आंब्रड येथील अनिकेत परब, वराड येथील रविना फुकट आणि पूजा चव्हाण यांची या पदासाठी निवड झाली आहे. सभेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

मुख्यमंत्री रोजगार कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना मानधन दिले जाते. पदवीधर उमेदवारांना दरमहा १० हजार रुपये, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना ८ हजार रुपये, तर दहावी उत्तीर्ण उमेदवारांना ६ हजार रुपये मानधन देण्यात येते. निवड झालेल्या तीन उमेदवारांपैकी दोन उमेदवार पदवीधर असून एक उमेदवार बारावी उत्तीर्ण आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मानधन मिळणार आहे.

पशुसंवर्धन विभागातील विविध कामांना मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच या नियुक्तीमुळे बेरोजगार युवकांना कौशल्य विकासासह प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. सभेदरम्यान मान्यवरांच्या हस्ते तिन्ही उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.