
वेंगुर्ला : महाराष्ट्र शासनाच्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६' अंतर्गत ग्रामपंचायत अणसूरने उत्कृष्ट कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायतीच्या पारदर्शक कारभार, नाविन्यपूर्ण उपक्रम, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला आहे.
याबाबत सरपंच सत्यविजय गावडे यांनी माहिती दली. ते म्हणाले, या अभियानादरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी साहेब यांची विशेष साथ व मार्गदर्शन लाभले. तसेच पंचायत समिती व जिल्हा स्तरावरून सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहायक गट विकास अधिकारी दिनेश पाटकर, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, विस्ताराधिकारी गुरुनाथ धुरी, भाजप तालुका प्रमुख पपू परब आणि वेंगुर्ला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी व जिल्हा स्तरावरील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
अणसूर ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांना व विकासात्मक कामांना प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वेंगुर्ला तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंनी केले. पत्रकारांच्या सकारात्मक बातमीदारीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन कामाला गती मिळाली, याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
या यशाचे खरे श्रेय आणि मुख्य हक्क अणसूर गावातील समस्त ग्रामस्थांचा आहे. ग्रामपंचायतीच्या प्रत्येक उपक्रमात आणि योजनेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन दिलेले मोलाचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले आहे. या अभियानात ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, सरपंच सत्याविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत सदस्य सीमा गावडे, संयमी गावडे, साक्षी गावडे, वामन गावडे, सुधाकर गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी सुप्रिया गावडे, सोनू गावडे, डिजिटल मित्र तनवी गावडे, सिद्धेश गावडे, प्राथमिक शाळेचे शिक्षक माळगावकर सर, सामंत सर, राऊत मॅडम, घाटवळ सर, गोडसे मॅडम, आरोग्य समुदाय अधिकारी प्रज्ञा धुरी, अंगणवाडी सेविका भक्ती गावडे, अनिशा गावडे, मदतनिस अन्नपूर्णा गावडे आणि आशा सेविका अनुष्का तेंडोलकर यांनी अथक परिश्रम घेतले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








