
दोडामार्ग : तालुक्यातील शिरवल येथील रहिवासी अन्नपूर्णा श्रीराम गवस ( ८५ ) यांचे गुरुवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी राहत्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, दीर, भावजय, मुलगी, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गुरुवारी दुपारी शिरवल येथील स्मशानभूमीत ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी श्रीराम कृष्णाजी गवस यांच्या त्या पत्नी होत.









