
वेंगुर्ला: तालुक्यातील तुळस पलतड- परबवाडी येथे अनेक वर्षे प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला.
तुळस पलतड- परबवाडी येथील श्रीराम लाडू परब यांच्या घरापासून अंगणवाडी पर्यत जाणाऱ्या रस्त्यासाठी पंचायत समितीच्या फंडातून ११ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याचे भूमीपूजन सभापती शंकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तुळस देवस्थानचे प्रमुख मानकरी दाजी परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुजता पडवळ, तुळस देवस्थान कमिटी अध्यक्ष तथा प्रमुख मानकरी अनिल परब, उपसरपंच नारायण कुंभार, सदस्य सचिन नाईक, जयवंत तुळसकर, बंटी परब, मानकरी शशीकांत परब, जनार्दन परब, लाडू परब, चंद्रे परब, साई परब , वैभव परब, श्यामसुंदर राय, राजेश परब, सुबोध परब, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र परब, श्री शेटकर, पोलीस पाटील सौ परब, शेखर तुळसकर, सोसायटी संचालक भूषण आरोस्कर, बूथ अध्यक्ष परेश नाईक, विद्याधर माळकर, शिवराम परब, अभि परब, ठेकेदार संजीव परब, दिलीप रेडकर, सभापती, उपसभापती स्वीय सहाय्यक महेश नाईक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती शंकर घारे म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून तुळस गावासाठी भरगोस निधी विविध कामांसाठी प्राप्त झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी लाखो रुपयांचा निधी जैतिर देवस्थान, आरोग्य केंद्र व विविध कामांसाठी आणलेला आहे. तुळस मधील हा रस्ता २३ नंबर मध्ये नोंद करण्यासाठी येथील संजय परब व चंद्रे परब यांनी खूप मेहनत घेतली. माझ्या सभापती पदाच्या कारकिर्दीत या रस्त्याला निधी मिळाला ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सभापती श्री घारे यांनी सांगितले.








