ॲड. अनिल निरवडेकर यांचा चर्मकार समाजाकडून सत्कार

Edited by: विनायक गांवस
Published on: December 24, 2025 20:58 PM
views 35  views

सावंतवाडी :  सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ॲड. अनिल निरवडेकर यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ (शाखा सावंतवाडी) यांच्या वतीने त्यांचा व त्यांच्या पत्नी सौ. अनघा निरवडेकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.


सत्काराला उत्तर देताना ॲड. निरवडेकर भावूक झाले होते. ते म्हणाले, "प्रभाग १० मधील मतदारांनी आणि विशेषतः चर्मकार समाज बांधवांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यामुळेच मी ९५९ मते मिळवून जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य घेणारा उमेदवार ठरलो आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा ६२९ मतांची आघाडी मिळणे, हा समाज बांधवांच्या निरपेक्ष प्रेमाचा विजय आहे. त्यांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही." गेल्या २८ वर्षांपासून मी या क्षणाची वाट पाहत होतो, असे सांगत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. "माणसाने कधी थांबावे हे त्याला समजले पाहिजे," असा टोला त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला लगावला.यावेळी त्यांनी पुढील ग्वाही दिली नगरपरिषदेत समाज बांधवांना नेहमीच आदराची आणि मानाची वागणूक दिली जाईल. प्रभागासह संपूर्ण शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चर्मकार समाज उन्नती मंडळाने दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांनी विशेष आभार मानले. यावेळी चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, सावंतवाडी शाखा तालुका अध्यक्ष विनायक चव्हाण संदीप बिबवणेकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवक ऍड अनिल निरवडेकर यांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी बोलताना निवृत्त उपशिक्षणाधिकारी परशुराम चव्हाण यांनी अनिल निरवडेकर यांचा पूर्ण इतिहास कथन करताना त्यांचा संघर्ष पाहिल्याचे सांगितले तर संदीप बिबवणेकर यांनी अलंकारिक भाषेत अॅड निरवडेकर यांच्या यशाचे कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उन्नती मंडळाचे सावंतवाडी शाखेचे सचिव जगदीश चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमासाठी

चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, सावंतवाडी शाखा तालुका अध्यक्ष विनायक चव्हाण सावंतवाडी शाखा सचिव जगदीश चव्हाण, उपाध्यक्ष कल्याण कदम, डॉ शरद जाधव, सहसचिव नरेश कारीवडेकर जिल्हा सदस्य नरसू रेडकर तालुका सदस्य राजा चव्हाण संजय बांबुळकर विजय ओटवणेकर  माजी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर ओमप्रकाश तिवरेकर सौ ऋतुजा सरंबळकर ,महादेव पवार सुनील तुळसकर संदीप बिबवणेकर पी बी चव्हाण लक्ष्मण आरोसकर आदी ज्ञाती बांधव उपस्थित होते.या सत्कार सोहळ्याला चर्मकार समाजातील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ॲड. निरवडेकर यांच्या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे