ओरोसमध्ये मालवाहू ट्रकचा भीषण अपघात;

दुभाजकावर चढून पथदिव्याचा खांब कोसळला
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 24, 2025 19:39 PM
views 65  views

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथील राजधानी हॉटेलजवळ बुधवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने रस्ते दुभाजकाला (डिवायडर) जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक थेट दुभाजकावर चढला असून यामुळे महामार्गावरील स्ट्रीट लाईटचा पोल आणि दुभाजकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रक क्रमांक MH 12 TV 9189 हा मुंबईकडे माल घेऊन जात होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास ओरोस येथील राजधानी हॉटेलच्या समोरील वळणावर अनियंत्रित झालेला ट्रक महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या सिमेंटच्या दुभाजकावर जाऊन धडकला.

ट्रकच्या धडकेमुळे महामार्गावरील पथदिव्याचा (स्ट्रीट लाईट) खांबही कोसळला आहे. दुभाजकाची झालेली दुरवस्था पाहून अपघाताची भीषणता स्पष्टपणे जाणवते. सुदैवाने, पहाटेची वेळ असल्याने आणि रस्त्यावर इतर वाहनांची वर्दळ कमी असल्याने मोठी हानी तळली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत.