
सावंतवाडी : शहरातील बांदा नाका येथील संचयनी पॅलेसचा इमारतीचा सांडपाणी प्रश्न गंभीर बनला असून येथील रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
शहरातील पोलिस ठाण्या शेजारी ही इमारत असून इमारतीचा सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या इमारतीच्या शेजारील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळच्यावेळी रस्त्यावरून जाण देखील कठीण होतं असून हे सांडपाणी आता शेजारील भागात देखील येत असल्याची तक्रार रहीवाश्यांनी केली आहे. यावर नगरपरिषद प्रशासनाकडून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.













