
सावंतवाडी : शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, आगामी महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे "स्टार प्रचारक" म्हणून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांची निवड करण्यात आली आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.श्री. केसरकर हे शिवसेना प्रवक्ते असून राज्याचे माजी मंत्री राहीले आहेत. मुंबई शहराचे ते पालकमंत्री होते. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे "स्टार प्रचारक" म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.













