LIVE UPDATES

नारळी पौर्णिमेनिमित्त ओरोसमध्ये रिक्षा चालक-मालकांची भव्य मिरवणूक

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 27, 2026 20:56 PM
views 92  views

सिंधुदुर्गनगरी : नारळी पौर्णिमेनिमित्त सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील रिक्षा चालक-मालक युनियनच्यावतीने भव्य मिरवणूक काढून पिठढवळ नदीला श्रीफळ अर्पण करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ओरोस रवळनाथ मंदिर येथे रिक्षा चालक-मालक एकत्र आले. येथून ओरोस फाटा, जिजामाता चौक मार्गे पिठढवळ नदीपर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्ग बिट्सच्या तालावर सहभागी रिक्षा चालक-मालकांनी उत्साहात सहभाग घेतला. नदीकाठी सर्वांनी श्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला.

या मिरवणुकीत रिक्षा युनियनचे अध्यक्ष नागेश ओरोसकर, सचिव समीर ओरोसरकर, खजिनदार सतीश सावंत, दिलीप मूळये, उद्योजक शेखर सावंत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांच्यासह शंभरहून अधिक रिक्षा चालक-मालक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.