
कुडाळ : सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट २००५ च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आय.एस.ओ मान्यताप्राप्त, भारत सरकारच्या पसारा मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रा. लि. आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांच्या प्लेसमेंट सेल व DLLE विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ जानेवारी २०२६ ते १५ जानेवारी २०२६ पर्यंत सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या भरतीस बेरोजगार युवकांना पर्मनंट नोकरी दिली जाणार आहे. त्याचबरोबर सर्व सुविधा ज्यामध्ये पी.एफ. सुविधा, मेडिकल, ग्रॅजुटी, पी.एफ.पेन्शन, विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन व नियमानुसार भत्ते दिले जातील, तसेच पेमेंट हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड किंवा महाराष्ट्र मिनिमम वेज नियमाप्रमाणे पेमेंट मिळणार आहे जे १६ हजार ते २५ हजार पर्यंत सुरुवातीस मिळेल व सर्व सूविधा दिल्या जातील. भरती होणाऱ्या तरूणांना महाराष्ट्रामध्ये मध्ये नोकरी दिली जाणार आहे, ही भरती प्रक्रिया दि.१२ जानेवारी २०२६ ते १५ जानेवारी २०२६ पर्यंत सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे सुरू राहणार आहे. तरी १५ जानेवारी पर्यंत या सुवर्ण संधी चा लाभ जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा.
भरतीसाठी : पात्रता १) शिक्षण : युवक हा कमीत कमी १० वी पास असावा. २) वय: किमान १८ वर्ष ते कमाल ४५ वर्ष. ३) उंची:१६८ से.मी. पेक्षा जास्त. ४) वजन ४८ किलो पेक्षा जास्त. युवक हा मेडिकली फिट असावा.
भरती साठी कागदपत्रे:१)आधार कार्ड झेरॉक्स २)१०/ १२ वी /ग्रॅज्युशन चे मार्कशीट पैकी 1 झेरॉक्स. ३) पासपोर्ट साईझ २ फोटो घेऊन येणे. ४) रेजिस्ट्रेशन फी ५०० रुपये (फक्त निवड होणाऱ्या युवकांसाठी) जागा भरल्यानंतर भरती प्रक्रिया बंद केली जाईल. असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे मॅडम, प्लेसमेंट सेल चे प्रमुख डॉ.एस. एस. लोखंडे सर व DLLE सेल चे प्रमुख डॉ.डी. जी. चव्हाण तसेच भरती अधिकारी, महेशकुमार सरतापे, गोरख जगताप सर यांनी केले आहे.
अधिक माहिती करिता संपर्क : ९२८४ १२५१०० / ८८८८६६९५९८
आयोजक : १. डॉ. एस. एस. लोखंडे – ९२२६७७२८५० २. डॉ. डी. जी. चव्हाण – ९९२३३७७६३२














