ब्युरो न्यूज : कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 ने पुन्हा एकदा लोकांच्या चिंतेत वाढ केली आहे. हे टाळण्यासाठी WHO ने आधीच ऍडवायझरी जारी केली आहे. गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रदूषित भागात मास्क घाला आणि सुरक्षित राहण्यासाठी अंतर राखा. दरम्यान, संसर्ग टाळण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे खूप महत्वाचे असते. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारात काढयाचा समावेश करणे गरजेचे आहे. हे प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्हाला अनेक फायदेही मिळतील. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदतप्रतिकारशक्तीमुळे आपण कोरोनासोबतच इतर आजारांवरही मात करू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळशीचा काढा पिऊ शकता. जो बनविण्यासाठी दालचिनी, काळी मिरी, आले याचा वापर केला जातो.
पचनासाठी फायदेशीर
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी ओवा फायदेशीर मानण्यात आलं आहे. हे बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीपासून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी आहे. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही ओव्याचा काढा पिऊ शकता.
सर्दी खोकला
हिवाळ्यात सर्दी-खोकला ही समस्या सामान्य असते. यादिवसात काढा तुम्हाला गुणकारी ठरू शकतो. यासाठी आले, दालचिनी, काळी मिरी, लिंबाचा रस इत्यादी एकत्र करून काढा बनवून घ्या. याचा तुम्हाला खूप फायदा होईल.
सांधेदुखीपासून आराम
हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काढ्याची मदत घेऊ शकतात. हळदीचा काढा प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.