सिद्धेश गावडेच्या घरी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची भेट

पीडित कुटुंबाला दिलासा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 21, 2025 19:16 PM
views 60  views

कुडाळ : तालुक्यातील राय वाडी येथे हल्ला झालेल्या सिद्धेश प्रमोद गावडे याच्या घरी शिवसेनेच्या ओबीसी व्हिजेएनटीच्या महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, तालुका प्रमुख अनघा रांगणेकर, तेंडोली विभाग प्रमुख आणि माजी सरपंच सचिन गावडे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सिद्धेश गावडे याची विचारपूस करून त्याला धीर दिला.

हल्लाग्रस्त सिद्धेश गावडे याचे वडील  प्रमोद गावडे, आई, बहीण आणि भावोजी यावेळी उपस्थित होते. त्यांनी झालेल्या हल्ल्यासंबंधीची सविस्तर माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कथन केली.

यावेळी बोलताना महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी, "या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू," असे सांगून गावडे कुटुंबाला धीर दिला.