
सावंतवाडी : लक्ष्मी पुजनाचे औचित्य साधून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी बाजारपेठेत व्यापारी वर्गाला शुभेच्छा देत दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी आपली परंपरा कायम राखली.
माजी मंत्री, आमदार श्री. केसरकर यांनी शहरातील बाजारपेठांत भेट देत लक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी व्यापारी, नागरिक यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना नेते प्रेमानंद देसाई, सुरेंद्र बांदेकर, आबा केसरकर, परिक्षीत मांजरेकर, अर्चित पोकळे, संकल्प धारगळकर, नंदू गावडे, शैलेश मेस्त्री आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.