
सावंतवाडी : हनुमान मित्रमंडळ उभाबाजार, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उभाबाजार येथील जीवनरक्षा कार्यालयात महा आरोग्य शिबिराचे दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगरसेविका सुकन्या टोपले, ॲड. सायली दुभाषी, डॉ. हर्ष साळगावकर, राजू मसुरकर यांनी मनोगत व्यक्त केली. शिबिरात अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतला.
यावेळी नगरसेविका शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, अपना दवाखान्याचे डॉ. हर्ष साळगावकर, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कोरगावकर, बाबल्या दुभाषी, यशवंत उर्फ बंड्या कोरगावकर, अरुण भिसे, बाळू कासार, हर्षल पोकळे, सचिन मळीक, कुंदन टोपले, होषांग कोरगावकर, कपिल कोरगावकर, परिचारिका तृप्ती अंधारी, गंगा सुतार, परिचर यशवंत परब, लॅब टेक्निशियन गायत्री वारंग, गंगा सुतार, परिचारिका व अनेक रुग्ण व नागरिक, महिला उपस्थित होते.














