LIVE UPDATES

Popcorn or Makhana for Weight Loss : पॉपकॉर्न की मखाना, वजन कमी करण्यासाठी काय 'बेस्ट'?

Makhana vs Popcorn : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' आणि 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन' यांनी मखाना आणि पॉपकॉर्न या दोन्हीचे पोषणमूल्य स्पष्ट केले आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 18, 2026 16:45 PM
views 94  views

मुंबई : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे.  वजन कमी करण्यासाठी काही वेळा आरोग्यदायी, कमी कॅलरी आणि कमी चरबीयुक्त स्नॅक्सचा वापर करतात. यात 'मखाना' (फॉक्स नट्स) आणि पॉपकॉर्न हे दोन्ही पर्याय उत्तम ठरतात. मात्र, काही लोकांना पॉपकॉर्नपेक्षा मखाना हा अधिक आरोग्यदायी पर्याय वाटतो. मात्र समोर आलेल्या आरोग्यविषयक अहवालांनुसार पॉपकॉर्न हा पर्याय अधिक चांगला मानला जातो. संध्याकाळच्या हलक्या आणि आरोग्यदायी नाश्त्यासाठी पॉपकॉर्न हा पर्याय अधिक चांगला आहे.

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि डाइजेस्टिवल हेल्थमध्ये प्रसिध्द झालेल्या संशोधनानुसार, ताजे पॉपकॉर्न खाल्ल्याने पचनसंस्थेला फायदे मिळतात. दुसरीकडे, मखाना हा पोषक तत्वांनी समृद्ध असा स्नॅक आहे. ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तो मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राखण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास, यकृतातील विषारी घटक बाहेर काढण्यास आणि मधुमेह व्यवस्थापित करण्यास मदत करतो.

'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' आणि 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन' यांनी मखाना आणि पॉपकॉर्न या दोन्हीचे पोषणमूल्य स्पष्ट केले आहे.

मखानाचे पोषणमूल्य
यामध्ये कॅलरीज ३४७, प्रोटीन ९–१० ग्रॅम, फायबर ७–१४ ग्रॅम, कॅल्शियम ५०–६० मिग्रॅ, लोह १.४–१.६ मिग्रॅ, पोटॅशियम३५०–५०० मिग्रॅ,

पॉपकॉर्नचे पोषणमूल्य

तेल, बटर किंवा अतिरिक्त फ्लेवर्स न वापरता तयार केलेल्या पॉपकॉर्नमधील पोषणमूल्यांमध्ये कॅलरीज ३८०, प्रोटीन ११–१३ ग्रॅम, फायबर १४ ग्रॅम, कॅल्शियम ७–१० मिग्रॅ, आयरन ३ मिग्रॅ, पोटॅशियम ३०० मिग्रॅ आहे.

डॉक्टरांच्या मते, जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी स्नॅक शोधत असाल, तर मखानाच्या तुलनेत पॉपकॉर्न हा अधिक चांगला पर्याय आहे. पॉपकॉर्नमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहण्यास मदत होते. मात्र, ते तयार करताना लोणी, मीठ किंवा अतिरिक्त फ्लेवर्सचा वापर करू नये. मीठ आणि तेलाचे प्रमाण जास्त असलेले आधीच पॅक केलेले पॉपकॉर्न आरोग्यासाठी चांगले नसते आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होत नाही.

(टीप : वाचकांपर्यंत वरील बातमी कोकणसाद लाईव्ह केवळ माहिती म्हणून पोहचवत आहे. कोणतेही उपचार, औषधे किंवा निर्णय हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.)