घरगुती उपायांनी बरा करूया सर्दी - खोकला

संजीवन चिकित्सक डॉ. श्री .नितिन जाधव यांचं खास मार्गदर्शन
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 01, 2022 17:09 PM
views 1016  views

लहान बाळांना सर्दी व खोकला झाला असेल तर १ छोटा कांदा (मिळाल्यास पांढरा) बारीक चिरून घ्यावा. तोच कांदा ३ कप पाण्यात उकळत ठेवा. तो काढा उकळून अर्धा झाल्यावर त्याला पिवळा रंग येईल. त्यात थोडी चवीपुरती साखर घालून तो काढा दिवसातून ३-४ वेळागरम किंवा कोमट करून बाळाला पाजावा. ह्या काढ्यामुले छातीत साठलेला कफ उलटी होऊन किंवा शी मधून बाहेर पडतो. छातीतून येणारा आवाज बंद होतो..

४ तुळशीची पाने, ३ लवंगा, २ वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे,  थोडासा गवती चहा, ४ कप पाण्यात उकळा.  पाण्याचा रंग बदलला की त्यात साखर घाला आणि हा काढाप्यायला दया. ( हा काढा २ वर्षावरील मुलांना अर्धा कप ह्या प्रमाणात दिवसातून २ वेळा प्यायला दया.).डोक्यात सर्दी भरलेली असेल आणि डोके दुखत असेल तर वेखंड पूड थोडयाशा पाण्यात कालवून कपाळावर लावावी. सर्दी उतरण्यास मदत होते..

लहान बाळांच्या छातीत कफ साठून त्रासहोत असेल तर २ कप पाण्यात १ चमचा जवस कुटून घालावा. या काढ्यात खडीसाखर घालून उकळून हा काढा कोमट करून ३/४ वेळा बाळांना दयावा. याने कफ बाहेर पडतो..आल्याचा रस २ चमचे त्यात दीड चमचा गुळकिसून घाला. ते चाटण दिवसातून २ ते ३ वेळेला चाटायला दयावा. (हे चाटण सुद्धा २ वर्षावरील मुलांना दयावे ) कोरडा खोकला झाला असेल तर या चाटणाचा उपयोग होतो..कोरडया खोकल्यासाठी जेष्ठ-मधाची बारीक पूड आणि साजूक तूप हे एकत्र करून त्याच्या छोटया गोळ्या करून उबळआल्यानंतर चघळण्यासाठी देऊ शकतो. (४ वर्षाखालील मुलांना दयावा).

कोरडा खोकला घालवण्यासाठी मसाल्याच्या वेलदोड्याचे दाणे बारीक करून त्यात १ चमचा मध मिसळून ४ ते ५ वेळा चाटल्यास उपयोग होतो. पण हे चाटल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये..खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला दयावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. ह्याने खोकला कमी होतो. (३ वर्षावरील मुलांपासून सगळ्यांना उपयोगी आहे.).बाळंतिणीने रोज ५ ते ७ तुळशीची पाणी खाल्ल्यास जन्म झालेल्या बाळाला सर्दी खोकला होत नाही. त्याचबरोबर लहान मुलांना अर्धा चमचा तुळशीच्या पणाचा रस अर्धा चमचा मधासोबत रोज २ वर्षापर्यंत दिल्यास छातीच्या रोगापासून संरक्षण होते. स्त्रोत : चिमणचारा, संपदा

लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर ७ घरगुती उपाय

ज्यावेळी आपल्याला सर्दी खोकला होतो त्यावेळी आपली काय अवस्था होते आपण किती हैराण होतो याची कल्पना आपल्याला आहेच. जर असाच सर्दी खोकला आपल्या लहान मुलांना झाला तर  त्यांची काय अवस्था होईल याची कल्पना न करणेच बरे.यावेळी मुलं चिड-चिडी होतात अश्यावेळी काही घरगुती उपायांमुळे त्यांना थोड्या फार प्रमाणात थोडासा आराम पडू शकतो असे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत


१. आहारात द्रव पदार्थाचे प्रमाण वाढवावेसर्दी आणि कफ झाल्यावर थंडीमुळे कमी तहान लागते त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झालेले असते.त्यामुळे सर्दी आणि कफ जर सुकण्याची शक्यता असते आणि सर्दी आणि कफ सुकला तर जास्त त्रास होतो. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यावर शरीरातील पाण्याचा तोल सांभाळणे गरजेचे असते. यावेळी सामान्य तापमानापेक्षा थोडे उष्ण द्रव पदार्थ म्हणजेच सूप,सार, वरणाचेपाणी अश्या पातळ पदार्थांचे  आहारातले प्रमाण वाढवावे. तसेच थोड्या थोड्या वेळाने मुलाला कोमट पाणी पाजावे

२. तुळशीची पानेतुळशीची पाने ही सर्दी आणि खोकल्यासाठी औषध म्हणून विविध प्रकारे वापरतात  तान्ह्या बाळाला सर्दी आणि पडसं होऊ नये म्हणून बाळंतिणीने रोज ५ ते ७ तुळशीची पाणी खाल्ल्यास अंगावर दूध पिणाऱ्या बाळाला सर्दी खोकला होत नाही. त्याचप्रमाणे  लहान मुलांना अर्धा चमचा तुळशीच्या पानांचा रस अर्धा चमचा मधासोबत रोज २ वर्षापर्यंत दिल्यास छातीच्या विकारांपासूनसंरक्षण होते. ( हा उपाय वैद्यकीय सल्ल्याने करावा)

३. दूध आणि हळदगरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालूनबाळाला पाजावे यामुळे लहान मुलांना सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हाउपाय फक्त लहान मुलांसाठीच नाही तर  मोठ्यांसाठी देखील उपयुक्त आहे ठरतो.४. लसूण आणि ओव्याचा शेकलसणाच्या काही पाकळया आणि ओवा तव्यावर चांगलं भाजून एका कापडात घेऊन त्याचा हलका शेक मुलांच्या छातीला द्यावा. जर ६ महिन्यांपेक्षा लहान मुल असेल तर मिश्रण असलेल्या कापडाची पुरचुंडी करून बाळाच्या पलंगाला बांधावी किंवा त्याचा आसपास ठेवावी  जेणेकरून त्याचा बाळाच्या  श्वासाबरोबर आत जाईल व त्याला आराम  पडेल.५. काढासर्दी खोकला म्हणालं की काढा हा आलाच. सर्दी आणि खोकला दूर पळवायचा असेल तर, ४ तुळशीची पाने,३ लवंगा,२ वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे,थोडासा गवती चहा,

४ कप पाण्यात उकळा. पाण्याचा रंग बदलला की त्यात थोडी  साखर घाला आणि हा  हा काढा  २ वर्षावरील मुलाला दिवसातून  दोनदा द्यावा

५. सुंठ व वेखंडचा लेपलहान मुलांना सर्दी झाल्यावर आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तीस सर्दीने डोके दुखत असेल तर थोड्या प्रमाणात सुंठ आणि थोडी वेखंड उगाळून किंवा त्यांची पावडर एकत्र करून पाण्यात कालवून कपाळावर लावावी. (२ वर्षावरील मुलांसाठी)सुंठ आणि वेखंड पावडर एकत्र करून पाण्यात कालवून लोखंडी पळी किंवा छोट्या लोखंडी कढाईत शिजवून कोमट करून त्याचा लेप कपाळावर लावावा 

६. चाटण २ वर्षावरील मुलांस कोरडा खोकला झाला असल्यास आल्याचा रस २ चमचे त्यात दीड चमचा गुळकिसून घाला. ते चाटण दिवसातून २ ते ३ वेळेला चाटायला दयावा. 


डॉ. श्री .नितिन जाधव.

संजीवन चिकित्सक. डोंबिवली

9892306092.