
सावंतवाडी : अथायु युरो केअर कोल्हापूर व युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष नगरसेवक देव्या सुर्याजी व नगरसेविका शर्वरी धारगळकर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त सावंतवाडीत मुत्रविकार तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर यांच्या उपस्थित या शिबीराचा प्रारंभ झाला. शेकडो जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यात शिबिरात मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, पाठीतून पोटात दुखणे, लघवीतून रक्तस्त्राव, वारंवार लघवी, मूत्रमार्गातील अडथळा, पुरूष वंध्यत्व, पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर तपासणी व समुपदेशन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये या शिबिराच आयोजन करण्यात आले होते. शेकडो रूग्णांनी याचा लाभ घेतला. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, नगरसेवक अजय गोंदावळे, नगरसेवक देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड सायली दुभाषी, स्नेहा नाईक, डॉ. अक्षय साळुंखे, डॉ.राकेश पाटील, डॉ. योगेश जाधव, डॉ.सत्यशिल रूपनवर, गौरांग चिटणीस, शिवसेना उपशहरप्रमुख सुप्रिता धारणकर, सुलोचना गावडे, प्रसाद देऊलकर,ॲड प्रसाद नाटेकर, अनिकेत पाटणकर, वसंत सावंत, अभिजीत गवस, संदीप निवळे,ॲड प्रथमेश प्रभू, देवेश पडते,नंदू कोरगावकर व रुग्ण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा रक्तदाता संघटनेचे सचिव विनायक गांवस यांनी केले.














