आजगाव तलाठी कार्यालय येथे मालजी यांचे उपोषण सुरू

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 13, 2026 20:01 PM
views 18  views

सावंतवाडी : आपल्या विविध मागण्यांकरिता आजगाव भोम येथील प्रकाश भिकाजी मालजी यांनी आजगाव तलाठी कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळीपासून उपोषण छेडले आहे. आपले वडील जिवंत असताना मयत दाखवून त्यांचा वारस तपास केला हा आपल्यावर अन्याय असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेली 15 ते 16 वर्ष मी सातत्याने लढा देत आहे. अद्याप पर्यंत त्याला यश आलेले नाही. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी मी शुक्रवार सकाळपासून आजगाव तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडल्याचे त्यांनी सांगितले.

या उपोषणातील प्रमुख मागण्या  वडील भिकाजी पांडुरंग मालजी हे हयात असताना मयत दाखवून मयत तारीख १३ एप्रिल १९६० ला वारस तपास केला त्याची सही सुद प्रत मिळावी. तसेच सन २००९ सालापासून झालेले तीन वारस तपास व त्याचे तीन मयत दाखले पोलीस पाटील दाखले सरपंच दाखले व पंचांची नावे मिळवीत.तसेच वरील पेपर देता येत नसतील तर आपण बेकायदेशीर लावलेले सातबारा (खाते) वर लावलेले नाव लगेच काढून देऊन सातबारा मोकळा करावा व स्वयंकुळाच्या आदेशाप्रमाणे पुढील पूर्तता सातबारा वरील नाव कमी करून व्हावी असा आदेश झालेला आहे. मात्र या प्रमाणे मंडल अधिकारी काम करत नाही याला जबाबदार कोण ? असाही प्रश्न मालजी यांनी उपस्थित केला आहे.