
देवगड : मोर्वे येथील श्रीदेव चव्हाटेश्वर मांड शिमगोत्सव मंडळाच्या वतीने शिमगोत्सवाचे औचित्य साधून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात गावातील ग्रामस्थ, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत लोकप्रतिनिधींचे जंगी स्वागत केले. या सोहळ्यात कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य सुनीलभाई पारकर, मालवण नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा सार्वजनिक बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर आणि देवगड पंचायत समितीचे सदस्य सदाशिव ओगले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राजकीय नेतृत्वासोबतच मोर्वे गावातील नूतन पोलीस पाटील मुकेश गणपत धुरत यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच, शिमगोत्सवाच्या काळात भाविकांना चहा वाटपाची निस्वार्थ सेवा करणाऱ्या राजाराम टिकम यांचा विशेष गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाबद्दल श्रीदेव चव्हाटेश्वर शिमगोत्सव मंडळाचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमास फौजदार कृष्णा ढोके, सुहास कोळंबकर, ज्ञानेश्वर ढोके, माजी उपसरपंच कंकाद्रीत लोणे, माजी ग्रामपंचायत सदस्य गणपत धुरत, सत्यवान कांदळगावकर, ग्रामपंचायत सदस्य महेश कोळंबकर, जितेंद्र बापर्डेकर, तेजस्विनी कोळंबकर,धनाजी धुरत, अरविंद सारंग, मिलिंद कांदळगावकर, राजेंद्र लोणे,गंगाधर गावकर,नामदेव बापर्डेकर, धर्मराज धुरत, संदीप गावकर, निखिल तारी, मनोज बापर्डेकर, तुषार गावकर,अरविंद मोर्वेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










