
वेंगुर्ले : ज्ञानवृद्धी ग्रामोत्कर्ष मंडळ वाचनालय केळूसच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा आरोग्य विभागाच्या सहकार्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ज्ञानवृद्धी ग्रामोत्कर्ष मंडळ वाचनालय व ग्रामपंचायत केळूस यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान आरोग्य मंदिर केळूस येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास रक्तदाताच्या उत्स्फुर्त प्रतिसाद लाभाला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केळूस गावचे सरपंच योगेश शेटये व परुळे प्राथमिक आरोग्य केंदाच्या वैद्यकीय अधिकारी शलाका सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच संजीव प्रभू, ग्रामपंचायत अधिकारी विवेक वजराटकर, आरोग्य सहाय्यिका तिलोत्तमा मुणनकर, ग्रामपंचायत सदस्य महेश नागवेकर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण वराडकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष साटम, ग्रामपंचायत सदस्या रुचिरा प्रभूकेळूसकर, ग्रामपंचायत सदस्या सुषम मसुरकर, ज्ञानवृद्धी ग्रामोत्कर्ष मंडळ वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद मडकईकर, कार्यवाह सतीश शेणवी, सदस्य मनोहर पावसकर, वाचनालयाचे ग्रंथपाल प्रतिक्षा चिपकर, कर्मचारी रामदास राऊळ, नारायण मोबारकर, अंकुश मुणनकर, आरोग्य सेविका रजनी नवार, आरोग्य सेवक महादेव परब, आशा सेविका सपना केळुसकर, आशा सेविका सुचिता केळुसकर, अनिता गोसावी आदी उपस्थित होते.
निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमसेन गायकवाड यांनी या रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट दिली. या शिबिरात प्रत्येक रक्तदात्याला सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.














