
देवगड : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा कुणकेश्वर कुणकेश्वर नं. नं. १ जेट जेट टॉय स्पर्धेमध्ये प्रथम, केंद्रशाळा कुणकेश्वर नं. १ शाळा राष्ट्रीय स्तरावर सहभागी होणार आहे. 'एसएई' इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या 'ए वर्शेल्ड इन मोशन' उपक्रमात जेट टॉय स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा नं. १ प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी महिंद्रा कंपनीचे सुबोध मोरये यांच्या मार्गदर्शनाखाली समीर वंजारे, समीर माडये व संजय मालप यांनी परिश्रम घेतले. देवगड येथे दि. १४ फेब्रुवारी रोजी दिवसभर झालेल्या या अनोख्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली संशोधन वृत्ती आणि कल्पकतेचे अनोखे दर्शन घडविले.
राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड
कुणकेश्वर सारख्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन, वेट, अॅक्युरसी डिस्टन्स या चार फेऱ्यांमध्ये अव्वल क्रमांक प्राप्त केला. तसेच 'ओव्हरऑल विनर' हा किताब मिळवला प्रथम क्रमांक मिळवलेल्या या विद्यार्थ्यांची निवड पुढे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे. याबद्दल कुणकेश्वर गाव परिसरातून विजेत्या विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.स्पर्धेत इयत्ता सहावीतील मृण्मय तेली, क्षितिज धुवाळी,मैथिली तेली, भूमिका घाडी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक तात्या लवटे, पदवीधर शिक्षिका अमृता पाटील,पदवीधर शिक्षक विठ्ठल थिकोळे, उपशिक्षिका पल्लवी ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कुणकेश्वर नं. १ या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवयानी तेली, उपाध्यक्ष सचिन मिस्त्री व सर्व सदस्य, सरपंच महेश ताम्हणकर,सर्व ग्रामपंचायत सदस्य,सर्व पालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे मुख्याध्यापक लवटे यांनी आभार मानले. या अंतर्गत विद्यार्थ्यांना सारख्याच प्रमाणात पुरविल्या गेलेल्या साहित्याच्या माध्यमातून 'जेट टॉय' करण्याची स्पर्धा झाली. तयार केलेल्या प्रकल्पांची त्यांच्या अधिकतम क्षमतांच्या मूल्यमापनाच्या आधारे निवड करण्यात आली. यामध्ये अधिकाधिक अंतर चालणे, वजन वाहून नेणे, ठरलेल्या ठिकाणी थांबणे, जास्त वेळ चालणे, जलद गतीने चालणे अशा चाचण्या व भविष्यातीलइंजिनिअरिंगमधील आव्हाने सादरीकरणाचा समावेश होता.उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी महिंद्राचे सर्व टीमचे सहकार्य लाभले.










