
देवगड : देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना पोंभुर्ले येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी पोंभुर्ले येथे असलेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी उभारलेल्या स्मारकात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी देवगड तालुका पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष हेमंत कुलकर्णी यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या समवेत गावच्या सरपंच प्रियांका धावडे, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सादिक डोंगरकर, बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर, बाजीराव जांभेकर, देवगड तालुका पत्रकार समितीचे सचिव दिनेश साटम, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आनंद लोके, कार्यकारिणी सदस्य प्रशांत वाडेकर, देवगड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, माजी अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, कार्यकारिणी सदस्य नागेश दुखंडे, स्वप्निल लोके, कोषाध्यक्ष महेश तेली, पत्रकार विष्णू धावडे अनिल राणे, सुरज कोयंडे आदी उपस्थित होते.










