निगुडे गावठणवाडीत शिवजयंती उत्साहात

शिवरायांचे विचार घराघरात पोहचवा : समीर गावडे
Edited by:
Published on: February 21, 2026 16:02 PM
views 11  views

सावंतवाडी : श्री देव गावठणकर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ निगुडे गावठणवाडी व कासकरटेंब आयोजित निगुडे गावठणवाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निगुडे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे,  माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, शिवजयंतीचे उत्सव समितीचे अध्यक्ष सर्वेश गावडे, गावठणकर देवस्थान समितीचे अध्यक्ष धनंजय गवंडे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गावडे, निगुडे माऊली देवस्थान समिती अध्यक्ष रवींद्र गावडे, निगुडे पोलीस पाटील सुचिता मयेकर, सुरेश मयेकर  आदींच्या हस्ते  दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी वाडीतील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देवू आत्माराम गवंडे, श्रीधर चंद्रकांत गावडे, कविता बाळकृष्ण गावडे, माजी सैनिक नाना खडपकर, गुंडू गोविंद गावडे, विठू कृष्णा गवंडे, बापू अर्जुन गावडे, संतोष आंबेकर, महेंद्र मोहन गावडे, विष्णू बाळकृष्ण बांदेकर, संदेश कानोबा गावडे, आदींचे स्वागत करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सरपंच समीर गावडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिवरायांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी मावळ्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. गेली १८ वर्ष सातत्याने आपण या ठिकाणी महाराजांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे. ही बाब अभिमानाची आहे. यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विठू गवंडे यांनी केले. यावेळी अजित मयेकर, सावळाराम गवंडे, न्हानू जाधव, मिलिंद गावडे, मयुरेश गावडे, आपा गावडे, बापू भास्कर गावडे, साईनाथ गवंडे, अमित गावडे, गोपाळ मोरजकर, अनय गावडे, नवनाथ मोरजकर, प्रताप गावडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.