
देवगड : पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी लक्ष दिल्यामुळे देवगड ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस तंत्रज्ञ उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय देवगड येथे डायलिसिस सुविधेत मोठी वाढ झाली असून CSR फंडातून प्राप्त झालेल्या दोन नव्या मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.या मशीन आल्याने आता डायलिसिस मशीनची संख्या चार झाली असून वाढीव दोन मशीन साठी एक तंत्रज्ञ देवगड मध्ये रुजू झाला आहे. यासाठी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी लक्ष घालून हा तंत्रज्ञ उपलब्ध करून दिला आहे.
देवगड ग्रामीण रुग्णालयात याआधी दोन मशीन सुरू होत्या आणि आता एकूण चार मशीन कार्यरत झाल्याने या विभागाची क्षमता दुपटीने वाढली आहे. सध्या डायलिसिससाठी १९ रुग्ण प्रतीक्षेत आहेत.
अन्य आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहे.या सर्व प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर देवगड परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना आता अधिक सुलभ आणि वाढीव डायलिसिस सुविधा उपलब्ध होणार असून आरोग्यसेवेत महत्त्वाची सुधारणा होण्याची व व्यक्त केली जात आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वाढलेल्या रुग्णभारामुळे विद्यमान कर्मचारी वर्गावर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती अधिकच्या तंत्रज्ञ उपलब्धतेसाठी देवगड ग्रामीण रुग्णालय समितीचे सदस्य व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते. व तंत्रज्ञ तातडीने देण्याबाबत विनंती केली होती.पालकमंत्री नितेश राणे यांनी शासन स्तरावर सूचना करून तातडीने एक तंत्रज्ञ उपलब्ध केला असून तो दाखलही झाला आहे.














