
सावंतवाडी : व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोलमध्ये 7 जानेवारी ला रक्तदान शिबीर - जगद्गगुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संस्थान नाणीजधाम यांच्या सावंतवाडी तालुक्यातील माडखोल सेवा केंद्राच्या वतीने व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, ता. सावंतवाडी येथे 7 जानेवारी 2026 रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
मानवी जीवनात रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, या दानाने माणसाचे आयुष्य वाचते, दरवर्षी प्रमाणे यंदाही जीवनदान महाकुंभ 2026 अंतर्गत ठिकठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जगतगुरु नरेंद्राचार्य संस्थान नाणीजधाम, माडखोल सेवा केंद्र यांच्यावतीने करण्यात येत आहे.














