LIVE UPDATES

Sawantwadi Illegal Liquor Seizure : सातार्डा चेकपोस्टवर सावंतवाडी पोलिसांची मोठी कारवाई

अवैध दारूचे ६०० बॉक्स जप्त : दोघे ताब्यात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 03, 2026 08:01 PM
views 33  views
Sawantwadi police seize 600 boxes of suspected illegal liquor at Satarda check post in Sindhudurg.

सावंतवाडी : सावंतवाडी पोलिसांकडून सातार्डा चेक पोस्ट येथे अवैध दारू वाहतूकीवर मोठी कारवाई करण्यात आली. यात लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दारूनं भरलेले तब्बल ६०० बॉक्स ताब्यात घेण्यात आले.  आज दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली. दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या कारवाईत अवैध दारूचे तब्बल ६०० बॉक्स असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार श्रीरंग टाकेकर, राहुल बर्गे यांनी केली. यावेळी पोलीस हर्षद हिंगे, श्री. धोत्रे, निलेश नाईक पंच शंकर साटेलकर, प्रकाश मेस्त्री आदी उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कणकवलीत भाजी मार्केटसाठी १९ लाखांचा निधी मंजूर
November 03, 2026
Kankavli Water Conservation : कणकवली कणकनगर येथील केटी बंधाऱ्यात लोखंडी प्लेटा बसविल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ
November 03, 2026
Devgad Fishermen Protest : कायकिंग पर्यटन आणि पारंपरिक मासेमारीचा वाद ऐरणीवर
November 03, 2026
Sindhudurg Forest Department seizes tiger teeth and leopard claws during a wildlife trafficking crackdown in Kudal.
Kudal Wildlife Smuggling Racket : कुडाळ बस स्थानकावर वाघनखे, दातसुळ्यांच्या तस्करीचा वनविभागाने केला पर्दाफाश
November 03, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg Forest Department seizes tiger teeth and leopard claws during a wildlife trafficking crackdown in Kudal.
Kudal Wildlife Smuggling Racket : कुडाळ बस स्थानकावर वाघनखे, दातसुळ्यांच्या तस्करीचा वनविभागाने केला पर्दाफाश
November 03, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : देवगड समुद्रात कर्नाटकची ‘सुलतान’ नौका ताब्यात
November 03, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg Crime : सोन्याची चैन लांबवणारे पसार संशयित ताब्यात
November 03, 2026
Police and bomb detection squad conduct a security check at Rajapur Civil Court in Ratnagiri following a bomb threat email.
Rajapur Court Bomb Threat : रत्नागिरी, सिंधुदुर्ग पाठोपाठ राजापूर न्यायालयालाही बॉम्बची धमकी
November 02, 2026