
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. जिल्हा परिषदेसाठी प्रत्यक्षात निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांची एकूण संख्या 115 तर पंचायत समितीसाठी 244 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. तर निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही यासाठी गस्त वाढविणे, प्रतिबंधात्मक कारवाई, तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयेाजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तसेच माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार 5 लाख 61 हजार 105 एवढे आहेत. यामध्ये 2 लाख 82 हजार 588 स्त्री मतदार तर 2 लाख 78 हजार 516 पुरूष मतदार आहेत. मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणूकीची वैशिष्टये
१ मतदाराची ओळख पटविण्यासाठी पक्कया न मिटणा-या शाईचा वापर केला जाणार.
२आचारसंहिता कक्ष व तक्रार निवारण कक्ष २४ तास कार्यान्वित
३ mahasecvotelist.in अॅपचा मतदारांची नावे शोधणेसाठी वापर करता येईल.
४गुगल प्ले स्टोअर वरुन matadhikar अॅप डाऊनलोड करुन मतदारांची माहिती प्राप्त करता येणार
५मतदाना सुरु होण्याआधी २४ तास प्रचाराची मुदत संपणार.
६जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन समिती गठीत तसेच निवडणूक सनियंत्रण समिती स्थापना
७खर्च नियंत्रण समिती गठीत, कॅश रिलीज कमिटी गठीत
एकूण मतदान केंद्रांची संख्या ८७० पैकी ८१० मतदान केंद्रावर मतदान होणार
मतदार यादी
•राज्य निवडणूक आयोगाकडील mahasecvoterlist.in अॅपचा वापर करुन मतदार यादीतील नावे शोधता येतील.
• दिनांक ०१/०७/२०२५ रोजीची अधिप्रमाणीत मतदार यादीचा वापर करणेत येणार
• दुबार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार, मा. राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक २९/१०/२०२५ चे आदेशान्वये कार्यवाही केली जाणार.
निवडणूकीसाठी आवश्यक मनुष्यबळ
•क्षेत्रीय दंडाधिकारी - 132
• केंद्राध्यक्ष - 891
• मतदान अधिकारी -०१- 891
• मतदान अधिकारी -०२ 891
• मतदान अधिकारी - ०३ 891
• शिपाई - ८७२
•व्यवस्थापक - ८७२
*एकूण - 5440*
याव्यतिरीक्त ०८ निवडणूक निर्णय अधिकारी, १६ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती , ०२ निवडणूक निरीक्षक नियुकत.
• मतदान यंत्रे तपशील - आवश्यक सीयू - 810 - राखीव -480
आवश्यक बीयू - 810 राखीव - 1162
प्रशिक्षण
•सर्व केद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण
(२४/०१/२०२६, ३१/०१/२०२६) तिसरे प्रशिक्षण - ०६/०२/२०२६
• सर्व नोडल अधिकारी, एफएसटी, व्हीएसटी पथकातील अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण २०-०१-२०२६ व ३०-०१-२०२६ रोजी पूर्ण.
मतमोजणी
• मतमोजणी आराखडा पूर्ण, मतमोजणी ठिकाणे निश्चित,
• मतमोजणी साठी दिनांक ०२/०२/२०२६ व ०६/०२/२०२६ रोजी प्रशिक्षण आयोजित
• सकाळी १०.०० वाजलेपासून होणार मतमोजणी
*प्रमुख मुद्दे -*
• मतदान होणारी एकूण मतदान केंद्रांची संख्या - ८१०
• ६७६ इमारतींमध्ये ८१० मतदान केंद्रे,
• एक केंद्र असलेली इमारत संख्या- ५५३,
• दोन केंद्र असलेली इमारत संख्या -११२,
• तीन केंद्र असलेली इमारत संख्या-११
• शॅडो एरिया मतदान केंद्रांची संख्या - ७० .
• १००० पेक्षा जास्त मतदार असलेलया मतदान केंद्रांची संख्या - ८६
• मतदार यादी चिठठी वाटप पूर्ण - ७८ % (4,42,042)
• एकूण मतदार - स्त्री - २८२५८८, पुरुष - २७८५१६, इतर- ०१ एकूण -५६११०५.
• मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी/कर्मचारी - ६३12
• क्षेत्रीय अधिकारी नियुक्त -१३४
• नियुक्त बीएलओ संख्या - ८१०
• संवेदनशील केंद्रांची संख्या - निरंक
• केंद्रावरील पोलीस नियुक्त संख्या - ८91
• वैदयकीय सुविधा कक्ष व Creche सुविधा - मतदान केंद्राच्या बाजूच्या खोलीमध्ये करणेत आलेली आहे.
• जलद कृती दल - प्रति तालुका ०२ जलद कृती दले तयार करणेत आलेली आहेत.
• वाहनांची संख्या - जीप-१३४, बस-११६ , मिनी बस - ०२.
• मतदान केंद्रनिहाय आरोगय विभागाकडून ८१० केंद्रावर किटचे वाटप होणार
• मतदान प्रतिनीधींची नेमूणका -८१० केंद्रासाठी करणेत येणार
• सखी मतदान केंद्र - ८ तालुक्यात 8 ठिकाणी स्थापन
• आदर्श मतदान केंद्र - ८ तालुक्यात 8 ठिकाणी स्थापन














