सोनुर्लीत विक्रांत सावंत यांचा डोअर टू डोअर प्रचार

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 04, 2026 19:48 PM
views 9  views

सावंतवाडी : माजगाव जिल्हा परिषद मतदार संघात सोनुर्ली येथे जिल्हा परिषद उमेदवार विक्रांत सावंत व पंचायत समिती सदस्य सचिन बिर्जे यांनी झंझावाती प्रचार केला. प्रत्येक घरोघरी प्रचारावर भर देतांना दोघांनाही लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते या प्रचारामध्ये सहभागी झाले होते. माजगाव जिल्हा परिषद मतदार संघामधून शिवसेना भाजपा महायुतीमधून विक्रांत सावंत आणि माजगाव पंचायत समितीसाठी सचिन बिर्जे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. या मतदारसंघात दोघांनाही जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. तरुण तडफदार आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून दोघांकडे पाहिले जात असून संपूर्ण मतदारसंघात विक्रांत सावंत यांना तसेच माजगाव पंचायत समितीमध्ये श्री बिर्जे यांना मतदारांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज सोनुर्लीमध्ये विक्रांत सावंत यांनी झंझावती प्रचार केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेशमा सावंत, माजी पंचायत समिती सभापती अशोक दळवी तसेच सोनुर्ली सरपंच नारायण इराक उपसरपंच भरत गावकर रमेश गावकर, मिलिंद गावकर, दशरथ गावकर, संतोष ओठवणेकर, विष्णू नाईक सत्यवान नाईक, सत्यवान मसूरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. घरोघरी भेटीगाठी देत दोन्ही उमेदवारांनी मतदान रुपी आशीर्वाद मागितले.