
सावंतवाडी : मोबाईलवर महिलेचा अश्लील फोटो तयार करून तो सर्वत्र फॉरवर्ड केल्याप्रकरणी सावंतवाडी, माजगाव गरड येथील अंतोन लुईस देसा, वय 36 या तरुणाला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सावंतवाडीतील एका महिलेचे फोटो एडिट करून अश्लील फोटो बनविल्या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांनी त्याच्यावर आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आज सकाळी ९ वा. अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.













