
मालवण : वायरी भूतनाथ पंचायत समिती मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार घनश्याम झाड यांचा झंझावाती प्रचार देवबाग गावात करण्यात आला. सर्व ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, नगरसेवक सहदेव बापार्डेकर, दाजी सावजी, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, हरी खवणेकर यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी होते.
भाजपा नेते खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनात महायुतीच्या माध्यमातून घरोघर प्रचार केला जात आहे. महायुती सरकारच्या जनहिताच्या योजना, केलेल्या विकास कामांच्या जोरावर वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघातून अक्षता गावडे, आणि पंचायत समिती उमेदवार घनश्याम झाड मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जनतेत राहून सेवाभावी वृत्तीने काम करणारे नेतृत्व घनश्याम झाड यांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता मोठया मताधिक्याने ते विजयी ठरतील. महायुतीचे सर्वचं उमेदवार विजयी होतील. असा विश्वास व्यक्त होत आहे.










