प्रांजली वाडेकर हिला धनुर्विद्येमध्ये सुवर्णपदक

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 24, 2024 13:39 PM
views 210  views

देवगड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे महाराष्ट्र राज्य अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड  आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा  नांदेड येथे 18 ते 20 ऑक्टोबर रोजी श्री गुरु गोविंद सिंग क्रीडा संकुल येथे संपन्न झाली.

या स्पर्धेत TWJ आर्चरी ॲकडमी, पुणे ची धनुर्धर कु. प्रांजली संजय वाडेकर  [रा. वाडातर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग] हिने सांघिक प्रकारात  सुवर्ण पदक (gold medal) प्राप्त केले. ती श्री शाहू मंदीर महाविद्यालय पर्वती, पुणे  येथील विद्यार्थिनी (student) आहे.

या यशात प्रशिक्षक  ओंकार घाडगे), राहुल पवार , व मयेकर सर यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.