LIVE UPDATES

देवगडच्या सिद्धी सावळेची दिल्ली दौऱ्यासाठी निवड

महाराष्ट्रातील ११ गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्थान; वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी साधणार थेट संवाद
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 25, 2026 08:49 PM
views 32  views

देवगड : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिद्धी सुभाष सावळे हिची दिल्ली दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे महाविद्यालयासह देवगड तालुका आणि संपूर्ण कोकणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

‘नजरेसमोर राष्ट्र... हृदयात महाराष्ट्र...’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातून निवड झालेल्या केवळ ११ गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सिद्धीने स्थान मिळविले आहे. ती सध्या महाविद्यालयात तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे.

या उपक्रमांतर्गत २५ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित दिल्ली दौऱ्यात सिद्धीला देशाच्या राजधानीतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटण्याची तसेच त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची अनोखी संधी मिळणार आहे. या अनुभवातून तिला प्रशासकीय कामकाज, देशाची यंत्रणा आणि करिअरच्या विविध संधी यांविषयी प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.

सिद्धीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण कर्ले, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, मानद अधीक्षक सुधीर साटम, प्राचार्य समीर तारी, करिअर कट्टाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉ. स्मिता सुरवसे, जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे, देवगड तालुका समन्वयक प्रा. अक्षता मोंडकर, सहाय्यक प्रा. कोमल पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाने तिचे अभिनंदन केले आहे. सिद्धीच्या यशाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.


ताजी बातमी

View all

सातार्ड्यात मायलेकाने एकमेकांचे हात बांधून तेरेखोल नदीत घेतली जलसमाधी
October 25, 2026
भाजयुमोतर्फे सावंतवाडीत भव्य बॉडी बिल्डिंग, नरकासुर स्पर्धा
October 25, 2026
कुणकेश्वर हायस्कूलच्या सार्थक घाडीची ज्युदो स्पर्धेत चमकदार कामगिरी
October 25, 2026
देवगडमध्ये अवैध पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाची कारवाई
October 25, 2026
संबंधित बातम्या

View all

भाजयुमोतर्फे सावंतवाडीत भव्य बॉडी बिल्डिंग, नरकासुर स्पर्धा
October 25, 2026
सिंधुदुर्ग विश्वासार्हतेचा 'हाय क्रेडिट स्कोअर'
October 25, 2026
सिंधुदुर्गात प्रथमच सावंतवाडीतील औदुंबर स्वामी मंदिरात रामसेतू शिळेचे दर्शन
October 25, 2026
सावंतवाडीचे लेखक दीपक पटेकर यांना सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन पुरस्कार
October 25, 2026