नवी दिल्ली : माजी सलामी फलंदाज व कोलकाता नाईट रायडर्स संघाला यंदाच्या मोसमात आयपीएलचे जेतेपद मिळवून देणारा गौतम गंभीर हा लवकरच भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कार्यरत होणार आहे.
बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीकडून गंभीरची मुलाखत मंगळवारी घेण्यात आली. मुलाखतीचा पहिला टप्पा पार पडला असून आता उद्या (ता. १९) आणखी एक मुलाखतीची फेरी होणार आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. येत्या ४८ तासांमध्ये याबाबतची घोषणा होऊ शकते.