ZP अध्यक्ष प्रमोद कामत यांचं डॉ. दिनेश नागवेकरांनी केलं अभिनंदन

Edited by: विनायक गांवस
Published on: March 17, 2026 15:32 PM
views 59  views

सावंतवाडी : राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शाळेत आले असता शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. नागवेकर यांनी त्यांचा सत्कार केला. विद्यार्थी यश मिळवतात तेव्हा शिक्षकांना होणारा आनंद गगनात मावेनासा होतो असे उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. यावेळी उपाध्यक्ष दादा साईल, जि.प. सदस्य दिपलक्ष्मी पडते, मायकल डिसोजा, डॉ. विनया बाड, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदी उपस्थित होते.