मुक्ताई ॲकेडमीच्यावतीने मोफत बुदधिबळ प्रशिक्षण

Edited by: विनायक गांवस
Published on: June 22, 2024 08:24 AM
views 197  views

सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीने जिल्ह्यातील मुलांसाठी व मुलींसाठी मोफत बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. शिबीरात पुढील महिन्यापासून होणा-या जिल्हास्तरीय ते राष्ट्रीय स्तरावरील शालेय व इतर स्पर्धां आणि त्यामधून मिळणा-या गुणांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शिबीर सावंतवाडी येथे खासकीलवाड्यात राजवाड्याच्या मागील बाजूस पाटणकरांच्या वाड्यात घेण्यात येणार आहे .रविवार 30 जून रोजी सकाळी 09.30 ते दुपारी 01.00 या वेळेत शिबीर घेण्यात येईल. विदयार्थ्यांनी कौस्तुभ पेडणेकर यांच्या 8007382783 या मोबाईल क्रमांकावर नाव नोंदणी करायची आहे.सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.