पायाभूत विकास महामंडळचे कार्यालय दोडामार्गात पाहिजे

उबाठा युवासेनेची मागणी
Edited by: लवू परब
Published on: June 04, 2025 14:02 PM
views 374  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील गोवा, दोडामार्ग तिलारी चंदगड हा 189 क्रमांकाचा राज्य मार्ग हा पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबई यांना हस्तांतरित केल्याने आपत्कालीन कालावधित रस्त्यावरील संकट दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केले आहेत. त्यामुळे पायाभूत विकास महामंडळ चे कार्यालय दोडामार्ग तालुक्यात पाहिजे अशी मागणी उबाठा युवासेनेकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. 

 दिलेल्या पत्रकात म्हटले की गोवा येथून दोडामार्ग मार्गे तिलारी चंदगड असा गेलेला रस्ता  क्र 189 हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादीत मुंबई यांना हस्तांतरित केल्याने या मार्गाच्या दोन्ही बाजूने  धोकादायक असलेली झाडे काढण्यासाठी दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिल असता ती आमची जबाबदारी नसल्याचे सांगत निवेदन धुडकावून लावले.

हा रस्ता पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्याकडे 28 नोव्हेंबर 2024 रोजी वर्ग केल्याचे त्यांनी सांगितले व याच्यापुढील रस्त्याची डागडुजी, आपतकालीन काळात घडलेली घटना या सर्व विषयाकडे हे महामंडळाची जबाबदारी असणार असल्याचे स्पष्ट शब्दात सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. त्यामुळे रस्त्यालगत वाढलेली धोकादायक झाडे, दुतर्फा वाढलेली झाडे, हटवायची कोणी? असा प्रश्न आता भरपावसात उपस्थित होत आहे. त्यामुळे महामंडळाने आपले कार्यालय दोडामार्ग तालुक्यात घालावे अशी मागणी त्यांनी युवासेनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.