LIVE UPDATES

चराठा येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 07:44 PM
views 122  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : चराठा टेंबवाडी येथील परेश उमेश तांबोस्कर (वय २६) या तरुणाचा राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून यामागचे नेमके  कारण कळू शकलेल नाही.

ही घटना गुरुवार उघडकीस आली.  परेश याचा चुलत भाऊ सकाळी आला असता परेश खोलीतील लाकडी वाशाला कुत्रा बांधण्याच्या साखळीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला खाली उतरवून पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने गावातील खासगी डॉक्टरांना बोलावण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी परेश याला मृत घोषित केले. या घटनेमुळे चराठा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.