सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आधुनिक सावित्री पुरस्कार सिंधुदुर्गच्या साहस प्रतिष्ठानच्या संस्थापक, अध्यक्षा रुपाली पाटील यांना हा पुरस्कार भारतीय जमीन बंदर प्राधिकरण दिल्लीच्या प्रशासकीय अधिकारी रेखा रायकर कुमार यांच्या हस्ते बारामती येथे वितरित करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या वतीने करियर कट्टा या उपक्रमांतर्गत आधुनिक सावित्री पुरस्काराचे वितरण बारामती येथील दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमात वितरित करण्यात आला. या कार्यक्रमावेळी प्राचार्य डॉ. पी.व्ही. रसाळ, (अद्यक्ष, करियर संसद राज्यस्तरीय समिती). रेखा रायकर कुमार, (प्रशासकीय अधिकारी, भारतीय जमीन बंदर प्राधिकरण, दिल्ली). मा.यशवंत शितोळे, (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र प्रो. डॉ. श्रीकुमार महामुनी (प्राचार्य, शारदाबाई पवार. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बारामती) आधी उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान दोन दिवसीय अधिवेशनामध्ये विविध वक्त्यांची चर्चासत्रे सांस्कृतिक कार्यक्रम व विविध शिबिरे कार्यक्रम संपन्न झाले. या अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कुडाळ व कणकवलीतून तीन कॉलेजचे विध्यार्थी, विध्यार्थिनी व प्राध्यापक सहभागी झाले होते. असें राज्यातील ११० कॉलेज नीं सहभाग दर्शवला. या दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा आणि वारसा आजच्या युगात अविरतपणे चालवून आधुनिक काळातील बदलत्या शैक्षणिक, सामाजिक, उद्योजकीय आणि सांस्कृतिक प्रवाहाला अनुसरून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काळानुरूप झालेल्या बदलांचा स्वीकार करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगले योगदान दिलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यातील १७ महिलांना हे पुरस्कार वितरित करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहस प्रतिष्ठान ही संस्था दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या न्याय व हक्कासाठी सेवाभावी काम करते या प्रतिष्ठानच्या संस्थापक, अध्यक्षा रूपाली पाटील यांच्या गेले अनेक वर्षाच्या कार्याची दखल या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राने घेऊन ३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी हे पुरस्कार राज्यातील उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांसाठी जाहीर केले.
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील रुपाली पाटील यांचा समावेश होता. काल बारामती येथे झालेल्या एका कार्यक्रम मध्ये पुरस्कार वितरित झाला. महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार तो ही सावित्रीबाईंच्या नावे त्यांच्या या लेकीला मिळाल्यामुळे खूप आनंद झाला. हा पुरस्कार सर्व दिव्यांग बांधवांचा, त्यांच्या पालकांचा आहे. माझी जबाबदारी आजून वाढल्याचे उद्गार रुपाली पाटील यांनी व्यक्त केले.