कणकवली शहरात रंगपंचमी उत्साहात साजरी

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 18, 2026 21:02 PM
views 157  views

कणकवली : कणकवली शहरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कणकवली शहराचे धुलीवंदन हे पाडव्याच्या आदल्या दिवशी असते आणि त्यानिमित्तानेच आज शहरातील लहान बालगोपाळांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून घरोघरी जाऊन रंगोत्सवाचा आनंद लुटला. ढोल-ताशांच्या गजरात आणि नृत्याच्या तालावर बालगोपाळांनी रंगांची उधळण करत गोमूचा नाच केला व सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमामुळे शहरात आनंदी आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

नागरिकांनीही या बालगोपाळांचे स्वागत करत त्यांना प्रोत्साहन दिले. पारंपरिक पद्धतीने साजरी झालेली रंगपंचमी कणकवलीकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली.