विधानपरिषदेच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला !

Edited by: ब्युरो
Published on: July 12, 2024 05:31 AM
views 214  views

मुंबई :  राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असून त्याआधी कुणाची ताकद किती याचा अंदाज येणार आहे तो आज होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad Election). जागा 11 पण उमेदवार 12 असल्याने एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित. विधानपरिषद निवडणुकीला अवघे काही तास राहिलेले असताना पराभूत होणारा तो बारावा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 

सुरुवाताली ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता असताना उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांच्या रुपात 12 वा उमेदवार दिला आणि निवडणुकीत रंगत आली. त्याचा फटका सत्ताधारी गटाला बसणार की विरोधकांना हे काहीच तासांमध्ये स्पष्ट होईल. 12 वा उमेदवार देऊन, उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शरद पवारांनी अजित पवारांना खिंडीत गाठण्याचं राजकारण केल्याचीही जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार निवडून येण्यासाठी देवेंद्र फडणविसांनी  सूत्रं हाती घेतल्याची चर्चा आहे.