कुडाळ शहरात राणे समर्थक प्रतिष्ठानची स्थापना

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 17, 2026 20:10 PM
views 53  views

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरातील कार्यकर्त्यांनी राणे समर्थक प्रतिष्ठानची स्थापना केली असून, या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. या राणे समर्थक प्रतिष्ठान मध्ये शिवसेना कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, ॲड. राजीव कुडाळकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, चेतन पडते, आनंद अणावकर, प्रथमेश केळबाईकर हे असून लवकरच या प्रतिष्ठानची सदस्य नोंदणी सुरू केली जाणार आहे अशी माहिती शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी दिली.