
सावंतवाडी : मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या किडनॅपरबद्दल माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठा खुलासा केला आहे. त्याने शासनाच्या एका मोहिमेत पैसे लावले होते. पण त्याला आपण स्वत: चेकने पैसे दिल्याचा खुलासा केसरकर यांनी केला आहे. मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या किडनॅपरबद्दल माजी शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी मोठा खुलासा केला आहे. त्याने शासनाच्या एका मोहिमेत पैसे लावले होते. पण, त्याला आपण स्वत: चेकने पैसे दिल्याचा खुलासा केसरकर यांनी केला आहे.
मुंबईच्या पवई येथील 17 मुलांना एका स्टुडिओत ओलीस ठेवल्याच्या प्रकरणात आता मोठा खुलासा होताना दिसत आहे. आरोपी रोहित आर्य याने शासनाकडून 2 कोटी रुपये मिळाले नसल्याचा आरोप केले होता. यासाठी त्याने माजी मंत्री दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री असताना उपोषण केलं होतं. त्याने आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून मुलांना ओलीस ठेवण्याचं घृणास्पद कृत्य केलं. रोहित आर्यच्या या कृत्यानंतर दीपक केसरकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपण रोहित आर्य याला स्वत: चेकने पैसे दिले होते, असा मोठा खुलासा दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीला फोनवर प्रतिक्रिया देताना केला. रोहित आर्य हे स्वच्छा मॉनिटर नावाची एक स्किम चालवत होते. ते शासनाच्या मोहीमेत सहभागी झाले होते. त्या संदर्भात त्यांनी काही मुलांकडून डायरेक्टली फी वसूल केली असं डिपार्टमेंटचं म्हणणं होतं. पण रोहित आर्य यांचं म्हणणं होतं की, आपण अशी कुठल्याही प्रकारची फी वसूल केलेली नाही. याबाबत त्यांनी डिपार्टमेंटसोबत बोलून विषय सोडवायला हवा होता. अशाप्रकारे मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं आहे, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली. मी शिक्षणमंत्री होतो तेव्हा पर्सनली त्यांना मदत केली होती. मी चेकने त्यांना स्वत: पैसे दिलेले आहेत. पण, सरकारच्या पेमेंटसाठी सर्व फॉर्मेलिटी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे त्यांचा जो क्लेम आहे. 2 कोटी मला येणं आहे हा मला तरी योग्य वाटत नाही. त्यांनी डिपार्टमेंटशी खात्री करावी आणि त्या संदर्भातील कागदपत्रे सादर करावेत, अस दीपक केसरकर म्हणाले.














