
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला पोचलेत. शिवतीर्थावर ही भेट झाली. दोघांमध्ये अर्ध्या तासापासून चर्चा सुरु आहे. आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची ठरणार आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी भाजपवर विधानसभेच्या निवडणुकीवरून निशाणा साधला होता. त्यानंतर CM फडणवीसच भेटीसाठी पोचल्यामुळे या भेटीला अधिक महत्व आलंय.