
सावंतवाडी : नाणोस जोशीवाडी येथील महापुरुष देवस्थान पर्यंतच्या रस्त्याच्या संरक्षण भिंत व मुख्य रस्ता ते महापुरुष देवस्थान पर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर , पंचायत समिती सदस्य नेहा कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नाणोस सरपंच अमिता नाणोसकर, ग्रामपंचायत सदस्या रसिका जोशी, सानिया शेट्ये, ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर, सखाराम जोशी, ज्ञानदेव जोशी, नारायण कांबळी, रोहन जोशी, राजेश जोशी, रवींद्र जोशी, रघुनाथ जोशी, समिता जोशी, सरिता जोशी, रुपाली जोशी, जोशीवाडी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.










